बाबू चित्रपटातील ‘दादल्या’ हे नवं गाणं रिलीज

सिनेमाच्या रसिकांना हळदीच्या समारंभासाठी गाजवलेले हे गाणं आवडत आहे. तुम्ही ‘बाबू’ चित्रपटातील ‘दादल्या’ हे गाणं पाहिलं आहे का ? सध्या हे गाणं चर्चेत आहे.

मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या बोलांना रोहन-रोहन यांचे उत्साही संगीत आहे, आणि चंदन कांबळे यांनी दमदार आवाजात हे गाणे गायले आहे. अंकित मोहन आणि मंदार मांडवकर यांच्यावर चित्रीत झालेले हे गाणे प्रत्येकाला ठेका धरायला भाग पाडते. हळदी समारंभात गाजणाऱ्या या गाण्यातील हूक स्टेप लवकरच ट्रेंडिंगमध्ये येईल. मयूर शिंदे दिग्दर्शित ‘बाबू’ चित्रपटातील टायटल सॉन्ग आणि ‘फ्युचर बायको’ हिट झाल्यानंतर आता ‘दादल्या’ हे गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.

हे गाणं प्रेमाच्या भावनांना व्यक्त करतं आणि त्याचे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत, तर ऋषिकेश कामेरकर यांनी याला संगीत दिलं आहे. अंकित मोहन आणि रुचिरा जाधव यांच्यावर चित्रीत केलेलं हे गाणं बाबू शेठच्या अनोख्या प्रपोजिंग स्टाईल आणि सुप्रियाच्या नखऱ्यांना दर्शवते. आगरी भाषेतील प्रेम आणि गोडवा या गाण्यात छानपणे व्यक्त केला आहे. ‘फ्युचर बायको’ हे गाणं प्रेमात असणाऱ्यांचं मन जिंकण्यासारखं आहे. 90 च्या दशकातल्या ‘बाबू’ कसा ‘बाबू शेठ’ बनतो, हे जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट पाहावा लागेल. ‘बाबू शेठ’च्या आयुष्याची ही कथा आहे.

सुनिता बाबू भोईर यांच्या निर्मितीतील ‘बाबू’ हा चित्रपट श्री समर्थ कृपा प्रोडक्शनने प्रस्तुत केला आहे. या चित्रपटाचे लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, मंदार मांडवकर आणि श्रीकांत यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Leave a comment