अभिनेते अशोक सराफ यांच्या ‘लाईफलाईन’ सिनेमातील एक नवीन गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. ‘होत्याचं नव्हतं झालं’ हे गाणं सिनेरसिकांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे.
‘होत्याचं नव्हतं झालं’ हे गाणं सिने रसिकांना खूप आवडत आहे. राजेश शिरवईकर यांनी लिहिलेल्या या गाण्याला अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे. हे हृदयस्पर्शी गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायले आहे. या सिनेमात मुख्य भूमिका अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांनी साकारली आहे.
एक प्रसिद्ध डॉक्टर आणि पारंपारिक परंपरा मानणाऱ्या किरवंत यांच्या विचारसरणीतील संघर्ष इथे दिसून येतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यात या दोघांपैकी एकावर आलेल्या संकटाचे चित्रण आहे. या संकटाचा सामना करताना मनातील तणाव आणि घालमेल या गाण्यातून स्पष्टपणे दिसते. या गाण्याच्या प्रत्येक ओळी मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत.
मराठी चित्रपट ‘लाईफलाईन’ मध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत. या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे, आणि समीरा गुजर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन साहिल शिरवईकर यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाचे निर्माते लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट आहेत.
Very nice tittle songs