Partun Ye Na – Song Lyrics

चित्रपट - नीळकंठ मास्तर (2015)

"परतून ये ना"

नीळकंठ मास्तर गीत

-----------------------

गीत -  गजेंद्र अहिरे

गायिका -  श्रेया घोषाल

गायक -  जावेद अली

संगीत दिग्दर्शक -  अजय अतुल

------------------------------------------

Lyrics

सुटला ठाव ये ना
तुटला गाव ये ना
सुटला ठाव ये ना
तुटला गाव ये ना
टीचल्या काळजाचा
सलतो घाव ये ना
सरे मधुमास ये ना
पुरे वनवास ये ना
सरे मधुमास ये ना
पुरे वनवास ये ना
अंधारून आला.. नभ ओला
परतून ये ना
अंधारून आला.. नभ ओला
परतून ये ना...

 

मेंदीच्या हाताने तू
सडा अंगणाला दिला
सये तुझ्या पावलांनी
मातीला सुगंध आला..
मेंदीच्या हाताने तू
सडा अंगणाला दिला
सये तुझ्या पावलांनी
मातीला सुगंध आला..
ओल्या हळदीच्या हाती
केशरी शेला
सांज ही उदास ये ना
दिन हे भकास ये ना
पापणीच्या पाकळ्यांचा
जळतो सुवास ये ना
सरे मधुमास ये ना
पुरे वनवास ये ना
सरे मधुमास ये ना
पुरे वनवास ये ना
अंधारून आला.. नभ ओला
परतून ये ना..
अंधारून आला.. नभ ओला
परतून ये ना...

 

सांज वेळी कौतुकाने
लाव तुळशीला दिवा
गाभार्यात अंधाराच्या
जन्म घेई सुर्य नवा..
सांज वेळी कौतुकाने
लाव तुळशीला दिवा
गाभार्यात अंधाराच्या
जन्म घेई सुर्य नवा..
चांद तुझ्या डोळ्यातल्या
आभाळाला दे.. ना
थिजला श्वास ये ना
विजला भास ये ना
सुटला धीर तरी
उरली आस ये ना
सरे मधुमास ये ना..
पुरे वनवास ये ना
सरे मधुमास ये ना..
पुरे वनवास ये ना
अंधारून आला.. नभ ओला
परतून ये ना..
अंधारून आला.. नभ ओला
परतून ये ना...

----------------------------------------

Music Composer  :-  Ajay-Atul

Movie Director  :-  Gajendra Ahire

Cast  :-  Omkar Govardhan, Adinath Kothare,

Neha Mahajan, Pooja Sawant etc.,

Singers  :-  Shreya Ghoshal, Javed Ali

-----------------------------------------

Released :  2015

Leave a comment