सुबोध भावेची नवी AI मालिका जोरात ; माही आणि अभिमन्यू यांचे पात्र आकर्षक

‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. तू भेटाशी नव्याने (सिरियल) शीर्षक गाणं पाहा.

“तू भेटाशी नव्याने” शीर्षक गीताचे बोल 👈 Click Here

सर्व प्रकारच्या आशय आणि विषयांच्या विविधतेमुळे काही मालिका झपाट्याने लोकप्रिय होतात. सध्या एक अशीच मालिका चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, ती म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’. सोनी मराठी वाहिनीने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट मालिका प्रेक्षकांसाठी प्रस्तुत केल्या आहेत, आणि प्रेक्षकांनी त्यांना खूप मान्यता दिली आहे. आता, ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या माध्यमातून सोनी मराठीने एक नवा प्रयोग केला आहे – ही पहिली एआय मालिका आहे. अल्पावधीतच, या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची ताजगीने भरलेली जोडी आणि प्रेमाच्या विषयाची अनोखी मांडणी यामुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे.

एआयचा उत्तम वापर केलेल्या या मालिकेला प्रेक्षकांकडून अनेक चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. ही प्रेमकथा दोन वेगळ्या काळांच्या शैलीत प्रस्तुत केली आहे, जी पुन्हा प्रेमात पडायला लावते. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत.

मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. प्रिया मराठे आणि किशोरी आंबिये यांच्या अदाकारीमुळे मालिकेत एक नवीन वळण आल्याचे दिसते. आयुष्यातले पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही, आणि त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम राहतात. या आठवणींच्या गोडसर धाग्याने माही आणि गौरी यांची प्रेमकथा या मालिकेत दर्शवण्यात आली आहे.

Leave a comment