Tu hi Re Majha Mitwa – Song Lyrics

मालिका - तू ही रे माझा मितवा (2024)

" तू ही रे माझा मितवा "

Tv Serial Title Song Lyrics In Marathi

-----------------------

गीत -  रोहिणी निनावे

गायक -  ह्रिषीकेश रानडे

गायिका -  सुगंधा दाते

संगीतकार  -  निलेश मोहरीर

--------------------------------

Lyrics

प्रेम कुणाचे
नाही कुणावर ...
नाही कुणावर ...
प्रेम असे
आभासच केवळ ...
आभासच केवळ ...
प्रेम असावी
एक कल्पना ...
प्रेम मनातील
व्यर्थ भावना ...
सोडूनी अर्ध्यावर
जाते कोणी कुणा ...
आठवांच्या उरती
छळणाऱ्या खुणा ...
तरी ही चाहूल गोड़ कुणाची
ह्या जिवास ओढ लावी
का नाव कुणाचे घेता
ही रात दरवळून यावी
ह्या मनात रुजलेला
कुणाचा गोडवा ...
तू ही रे माझा मितवा ...
तू ही रे माझा मितवा ..3..
मनातून जात नाहीस तू
कितीही दूर जाण्याने
तुझ्याशी भेट होई पुन्हा
कुठल्याशा बहाण्याने ...
तुझ्यावर प्रेम नाही तरी
बघते वाट का तुझी
दिसता चेहरा तुझा
मी न राहते माझी ...
तुझ्या मोहक हसण्याने
या मनी वाजे अलगूज
त्या धुंद आठवांची
कानामधे कुजबूज
हा खेळ या मनाला ..
वाटे का हवा ...
तू ही रे माझा मितवा ...
तू ही रे माझा मितवा ..3..
-----------------------
Released 2024

- Star Pravah -

"Tu Hi Re Majha Mitwa" is a Marathi serial Aired on Star Pravah from 23 December 2024. Sharvari Jog(Ishwari), Abhijit Amkar(Arnav), Ashutosh Gokhale(Rakesh) in lead roles. Other Cast members include Swati Chitnis(Subhadra), Rupal Nand(Anjali), etc. This show is directed by Shailesh Shirsekar and produced by Mahesh Tagde & Jitendra Gupta, the serial is presented under the banner of Tell a Tale Media Production. This serial is official remake of Hindi tv show "Iss Pyaar Ko Kya Naam Doon".

Leave a comment